Breaking News

उत्तर प्रदेशात प्रेम विवाह केल्याने तरूणीला घरच्यांनीच जिवंत जारप

मुरादाबाद, दि. 25 - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका तरूणीने प्रेम विवाह केल्याने तिच्याच कुटुंबियांनी तिला जिवंत जाळल्याची घटना घडली. यात त्या  तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तीन वर्षांपूर्वी या तरूणीने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आपल्याच शेजारी राहणा-या तरूणाबरोबर प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे  तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या सासरी जाऊन तिला जिवंत जाळले. तरूणीला वाचवण्यासाठी नणंदेने प्रयत्न केला असता ती गंभीररित्या जखमी झाली.