मणिपूरला भूकंपाचे सौम्य धक्के
चांदेल, दि. 25 - मणिपूरमधील चांदेल परिसराला आज पहाटे 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या संदर्भात अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र भूकंपाची तीव्रता लक्षात घेता जीवित वा वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. मणिपूर राज्यात झालेला हा महिन्याभरातील चौथा भूकंप आहे. या आधी 19 जूनला राजधानी इम्फाळ येथे 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर त्या आधी काही दिवसांपूर्वी चुराचंदपूर जिल्ह्यात 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच, 1 जूनला सायंकाळी 5.48 मिनिटांनी सेनापती जिल्ह्यात भूकंप झाला होता.