Breaking News

श्रीकांतने पटकावले ‘ऑस्ट्रेलियन सुपर सिरिज’चे विजेतेपद

सिडनी, दि. 25 - भारताच्या किदम्बी श्रीकांतने आज ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत  द्वितीय स्थानावर असलेल्या ऑलिम्पिक पदकविजेत्या चीनच्या चेन लाँगला अटीतटीच्या सामन्यात 22-20, 21-16 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. लाँगने  लौकिकाला साजेसा खेळ करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पहिला गेम लाँग जिंकणारही होता, पण ऐन वेळी लाँगचा फटका चुकला आणि पहिला गेम श्रीकांतने  जिंकला. त्यानंतर दुस-या गेममध्ये श्रीकांतने लाँगला डोके वर काढू दिले नाही आणि दुसरा गेमही जिंकत लाँगवर कारकिर्दीतील पहिलावहिला विजय मिळवला.  श्रीकांतचे हे सलग दुसरे ‘सुपर सिरिज’ विजेतेपद आहे. गेल्याच आठवड्यात त्याने इंडोनेशिया सुपर सिरिजचा किताबही जिंकला होता.