Breaking News

सिंचन घोटाळा : अजित पवारांच्या चौकशीची शक्यता, ईडीनं एसीबीकडून कागदपत्रं मागवली

मुंबई, दि. 05 - सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  एसीबीकडून घोटळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रं मागवली आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष  म्हणजे, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागानं केली होती. याप्रकरणी काही  शासकीय अधिकार्‍यांना एसीबीनं अटकही केली होती. पण अजित पवारांचा यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीनं कागदपत्रं  मागवली आहेत. आता याप्रकरणी अंमलबजाबणी संचालयनालयानं एसीबीकडे घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं मागवली असून, अजित पवारांची चौकशी होण्याचे संकेत  मिळत आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा 72 हजार कोटी रूपयांचा सिंचन घोटाळा आहे तरी काय? 72 हजार कोटी  रूपयांचा घोटाळा थोडक्यात समजून घेण्यासाठी या दहा पॉईन्टची थोडीफार मदत नक्कीच होईल.