Breaking News

अनैतिक संबंधांतून इसमाने दोन मुलांना जाळले

बीड, दि. 25 - आपल्या पतीचे भावजयीसोबत अनैतिक संबंध होते त्याला विरोध केल्याच्या कारणावरूनच नव-याने दोन मुलांना जाळले असल्याची तक्रार काल  वडलांनी जाळून मारलेल्या दोन मुलांच्या आईने पोलिसांत केली आहे.या मुळेच तिने न्यायालयात धाव घेवून मुलांचा ताबा मागितला होता. माजलगाव तालुक्यातील  टालेवाडी येथे कुंदन वानखेडे याने आपल्या बलभीम आणि वैष्णव या दोन मुलांना जाळून मारले होते. त्या नंतर रात्री मुलांची आई रेखा वानखेडे हिने फिर्याद दिली  होती.पती कुंदनचे त्याची भावजय व रेगाची जाउ अनिता सोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे रेखा व कुंदन यांच्यात रोज वाद व्हायचे. या रोजच्या वादाला कंटाळून  रेखा माहेरी निघून गेली.यानंतर तिने न्यायालयात दावा टाकून मुलांची मागणी केली. याचा निकाल शुक्रवारी लागणार होता. या मुळे कुंदनने वरिल कृत्य केले असावे  अशी शक्यता आहे पोलिस त्याच्या शोधात आहेत.