Breaking News

पेट्रोलपंपावर चोरी होत असल्याचे उघड

औरंगाबाद, दि. 25 - ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शहर गुन्हे शाखेच्या मदतीनेारी दुपारी अदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपावर छापा टाकला. या तपासणीमध्ये  पाच लिटरमागे 55 ते 150 मिलीलिटर पेट्रोल चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मशीनमधील ‘पल्सर’ हा भाग जप्त केला आहे.त्या पाठोपाठ औरंगाबाद  शहरातील आणखी एका पेट्रोलपंपावर इंधन चोरी होत असल्याचे उघड झाले असून तपासणीसत्र चालु राहणार आहे. पेट्रोलपंपाच्या मशीनमध्ये फेरफार करून देणा-या  दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. या आरोपींनी नाशिक, कोकण, औरंगाबाद आदी शहरांच्या पेट्रोलपंपावर मशीनमध्ये पेट्रोल चोरी करणा-या चिप  बसवल्याची माहिती दिली. या माहितीवरून ठाणे गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले. शहर गुन्हे शाखा व वजन मापे विभागाच्या पथकासोबत त्यांनी  चुन्नीलाल पेट्रोल पंपावर छापा मारला. यामध्ये पेट्रोल पंपाच्या मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढून त्याची अधिकृत मापकाद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी 55  ते 75 मिली लिटर पेट्रोल कमी भरले. एका मशीनवर हा प्रकार आढळल्यानंतर त्या ठिकाणी पेट्रोल भरून देणा-या इतर यंत्राची देखील तपासणी करण्यात आली.  यावेळी मशीनमधील पल्सर हा भाग पोलिसांनी जप्त केला. तो तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. ही  कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास घोडके, पीएसआय अविनाश महाजन, शिवराज बेंद्रे, जमादार अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, एस. बी.  सुर्वे, वजन मापक निरीक्षक ए. एस. कुलकर्णी, शिवहरी मुंढे; तसेच शहर गुन्हे शाखेचे पीएसआय नंदकुमार भंडारे व पथकाने केला.