सातवा पुणे लघुपट महोत्सव 9 जूनपासून
पुणे, दि. 03 - नवोदीत कलाकार आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ देण्यासाठी मराठी चित्रपट पररिवार आणि अदित्य प्रॉडक्शन्सच्यावतीने सातवा पुणे लघुपट महोत्सव 9 ते 11 जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा महोत्सव होणार आहे. भारतासह विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक पद्माकर नष्टे आणि अदित्य दाढे यांनी दिली. 11 जून रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, प्रसिध्द संगीतकार राहुल रानडे, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, निर्माते अदित्य दाढे, इम्पाचे संचालक विकास पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभासले, वैभव जोशी यांच्या हस्ते पारितोषिक विातरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या प्रवेशिकांसाठी 9890850903 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.