Breaking News

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा देशात 36वा क्रमांक

औरंगाबाद, दि. 09 - भारतातील राज्य विद्यापीठांचे रँकींग घोषित करण्यात आले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने देशात 36 वा  क्रमांक पटकाविला आहे. ‘द विक-हंस रिसर्च सव्र्हे 2017‘ अंतर्गत देशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांचे रँकींग घोषित करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील  राज्य विद्यापीठांमध्ये हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचा (542 गुण) पहिला क्रमांक आला आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (319  गुण) 36 वा क्रमांक मिळविला आहे. तसेच भारतातील सर्व विद्यापीठाच्या रँकींगमध्ये दिल्ली विद्यापीठ (682 गुण) पहिल्या क्रमांकावर असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाने 56 वा क्रमांक मिळविला आहे. संशोधन, नवोन्मेष, पायाभूत सुविधा याआधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.‘विक-हंस‘च्या रँकींग मध्ये  आपल्या विद्यापीठाने पहिल्या 50 मध्ये सातत्याने स्थाने अबाधित ठेवले आहे. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे, कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, प्रभारी अधिकारी डॉ.सतिश पाटील  यांनी सर्व विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांचे अभिनंदन कौतुक केले आहे.
‘संशोधन, नवोन्मेष‘ला प्राध्यान्य : कुलगुरु विद्यापीठाने ‘गुणवत्ता व सामाजिक बांधिलकी‘ हे ब्रीद गेल्या 58 वर्षापासून जपले आहे. कुलगुरुपदाची सुत्रे हाती  घेतल्यापासून ‘दर्जेदार संशोधन व नवोन्मेष‘ याला प्राध्यान्य दिले आहे. राज्य विद्यापीठातील ‘रँकींग’ मध्ये विद्यापीठाने 36 वा क्रमांक मिळाला ही आनंदाची व  अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी व्यक्त केली.