Breaking News

21 ’आप’ आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली, दि. 25 - आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21 आमदारांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. लाभाच्या  पदासंदर्भातला म्हणजेच ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ प्रकरणी खटला चालवण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 13, मार्च 2015 रोजी केजरीवाल  सरकारने आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांना मंत्र्यांचे संसदीय सचिव बनवण्याची घोषणा करुन अध्यादेश जारी केला होता.
दरम्यान याप्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यात यावा अशी मागणी आपच्या आमदारांनी केली होती. त्यांची ही मागणी  (शनिवार) निवडणूक  आयोगानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे ‘आप’ला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. या आमदारांचं म्हणणं की, ‘दिल्ली हायकोर्टानं आमची नियुक्ती अवैध  ठरवून रद्द केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाला हा खटला चालवण्याचा कोणताही अधिकार नाही.’ पण निवडणूक आयोगानं स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की,  ‘आपच्या आमदारांविरोधात ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’चा खटला सुरुच राहणार आहे.