छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद
सुकमा (छत्तीसगड), दि. 25 - सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील टुंडामारका जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात एसटीएफचे (स्पेशल टास्क फोर्स) दोन जवान शहीद झाले. पेट्रोलिंगसाठी जात असलेल्या सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. 12 ते 15 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. डीआयजी पी. सुंदर राज यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
या घटनेत एकूण पाच जवान जखमी झाले. त्यापैकी दोन जवान शहीद झाले. जखमी जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत. सुकुमातील चिंतागुफा परिसरातील टुंडामरका जंगलात सीआरपीएफ आणि पोलिसांचं नक्षलावाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु आहे. याच ऑपरेशनअंतर्गत जवान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी एसटीएफच्या जवानांवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात नक्षलवाद्यांच्या कंपनी नंबर-6 च्या सेक्शन कमांडरचा पोलिसांनी खात्मा केला होता.