Breaking News

बुरहाननंतर हिजबुल कमांडर सबजार भट्ट ठार

श्रीनगर, दि. 27 - हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर भारतीय सेनेनं आणखीन एक हिजबुलचा कमांडर सबजार अहमद भट्ट याचं एन्काऊन्टर केलंय. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सबजार भट्ट बुरहानचा साथीदार असल्याचं सांगितलं जातयं. बुरहान ठार झाल्यानंतर सबजारला कमांडर बनवण्यात आलं होतं. सबजारसोबत आणखीन एक दहशतवादी मारला गेलाय. त्याचं नाव फैजान असल्याचं सांगितलं जातं.