Breaking News

आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने साळवे सन्मानित

अकोले, दि. 27 - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईच्यावतीने विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश सखाराम साळवे यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
शिर्डी येथे गोल्डन व्हयु हॉटेलच्या हॉलमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्यात आठ व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. साईबाबा संस्थानचे  विश्‍वस्त सचिन तांबे यांच्याहस्ते सन्मानपत्र सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. यावेळी मनुष्यबळ विकास लोकसेवा विकास अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी  जगदाळे, एम. जी. घागरे, प्रकाश सावंत, के. एल. गोगावले हे उपस्थित होते. त्यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन होत आहे.