लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अकोले, दि. 27 - लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना धामणगाव पाट (ता. अकोले) येथे घडली असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. धामणगाव पाट येथील 14 वर्षांची ही अल्पवयीन तरुणी असून आरोपी हा संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील आहे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी गुन्हा रजि नं. 72/2017 नुसार कलम 376च्या 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दीपक चंद्रभान बढे (वय 27, रा. मेंढवन, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे खोटे सांगून आरोपी बढे याने पीडित मुलीवर 16 एप्रिल 2017 रोजी दुपारी 1 वाजता व दि. 22 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता धामणगाव पाट (ता. अकोले) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पाण्याच्या टाकीजवळ अत्याचार केला. अशा पीडित मुलीच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र अहिरे हे करत आहेत.
