Breaking News

भाजपाने देशात अघोषित आणीबाणी जाहिर केल्यासारखे वाटते - अशोक चव्हाण

मुंबई, दि. 27 - भाजपा सरकारने आपल्या देशात अघोषित आणीबाणी जाहिर केल्यासारखे वाटते, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज  येथे केले. कायदा सुव्यवस्था संपूर्णतः बिघडलेली आहे, त्यामुळे समाजातील सर्व घटकातील लोकांना घेऊन एक मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. हा देश  भाजपा मुक्त करू या, भाजपा चाले जाव चा नारा भारतभर घुमला पाहिजे. राहुल गांधीजी आपल्याला म्हणाले आहेत डरो मत हिम्मत से आगे बढो. हार गया हो तो  क्या हुंआ फिर जितेंगे. भिवंडीत आणि मालेगावात काँग्रेसला बहुमत मिळालेले आहे हि तर सुरुवात आहे. संपूर्ण देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणू या. 
ते पुढे म्हणाले की जीवनावश्यक वस्तू महाग झालेले आहेत. पेट्रोल डीझेलचे भाव वाढले. या सरकारचे आर्थिक नियोजन नाही. सामान्य जनतेची लुट माजवलेली  आहे. आता जीएसटी मधून किती लुट करणार आहेत हे कळेलच काही दिवसात. सामान्य जीवन महाग झालेले आहे. आपल्या संघर्ष यात्रेतून आम्हाला शेतकर्‍याच्या  व्यथा जाणून घेता आल्या, शेतकरी रडत आहेत, या भाजपा सरकारच्या काळात 9500 शेतका-यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सगळीकडे हाल बेहाल असताना  कसला आणि कोणता मोदी उत्सव हे सरकार साजरे करत आहे. हा देश भाजपा मुक्त करूयात आणि काँग्रेसचे सत्ता पुन्हा आणू या हि प्रतिज्ञा यावेळी आपण करू या.  आझाद मैदानात काँग्रेसतर्फे आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनाला काँग्रेसचे आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित  होते.