नांदूरी दुमाला येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला
संगमनेर, दि. 27 - शेतात पाणी भरुन घरी परतणार्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे मानवावरील हल्ले सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल बुधवारीही मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नांदुरी दुमाला येथे ऊसाच्या शेतात पाणी भरण्यास गेलेल्या सौ. शारदा निवृत्ती कवडे (वय 35) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिच्या हाताच्या पंजाला बिबट्याने चावा घेतला. तिचा पती निवृत्ती महादू कवडे व मुलगा वेळीच धावून आल्राने तिचे प्राण वाचले. अन्यथा रात्रीची वेळ असल्याने या महिलेच्या जिवावर बितली असती. या घटनेची माहिती सकाळी वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांना देण्यात आली. त्यांनी लागलीच वनपाल शेखर पाटोळे, वनरक्षक सुदाम उपासणी, वनमजूर ओंकार बोरुडे, अरुण यादव यांना पिंजरा घेवून घटनास्थळी दाखल केले.
दरम्यान जखमी सौ. शारदा कवडे यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यातील बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याची तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील ओझर बुद्रूक व नांदुरी दुमाला येथे दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले. यामुळे तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. दरम्यान नांदुरी दुमाला येथे वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे. तर तालुक्यातील अनेक गावांनी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.