Breaking News

संगमनेर नगरपालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या शांती घाटाच्या कामाची आ. थोरात यांच्याकडून पाहणी

संगमनेर, दि. 27 - आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विविध विकासकामांतून संगमनेर शहर रायात मॉडेल  ठरले आहे. या वैभवात भर टाकतांना संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने प्रवरा संगम येथे चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत 1 कोटी रुपये खर्चाच्या सुरु असलेल्या शांती  घाटाच्या कामाची आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. 
याप्रसंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक विश्‍वास मुर्तंडक, किशोर पवार, हिरालाल पगडाल, नुरमहम्मद शेख,  डॉ. दानीश खान, किशोर टोकसे, नगरसेविका सौ. रुपाली औटी, सोनाली शिंदे, सुनंदा दिघे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर,अफजल शेख,रईस बेपारी, मिलींद  औटी, मच्छिंद्र दिघे, इसाहाक खान पठान आदीं मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांनी सुरु असलेल्या कामांबाबत सुचना केल्या.
नगरपालिकेच्यावतीने सातत्याने लोकाभिमुख काम करुन आपला रायात ठसा उमटविला आहे. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी सतत नागरीक व महिलांमध्ये  स्वच्छतेबाबत जागृती करुन स्वच्छ व हरीत संगमनेर बनविण्यासाठी काम केले आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास कामे करतांना प्रवरा नदीवर प्रवरा  संगम येथे दशक्रिया विधी करतांना नागरीकांना ऊन, पाऊस या सारख्या नैसर्गिक समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांच्या सोईसाठी 1 कोटी  रुपये खर्चाच्या घाटाची निर्मीती करण्यात येत आली असल्याचे सौ. तांबे यांनी सांगितले. लवकरच शांती घाटाचे काम पुर्ण करुन नागरीकांसाठी खुला करण्यात येणार  आहे. यावेळी सुरु असलेल्या कामाबाबत नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच बाधंकाम विभागाचे इंजिनीअर  तळेकर यांनी माहिती दिली.