Breaking News

निळवंडेच्या उच्चस्तरीय कालव्यांसाठी 22 कोटी मंजूर

अकोले, दि. 27 - निळवंडे धरणाचे उच्चस्तरीय कालंव्याच्या प्रश्‍न मार्गी लागला असून 22 कोटी रुपये निधी सरकारने मंजूर केला असून पालकमंत्री ना. राम शिंदे  यांनी केलेले विशेष प्रयत्नामुळे  जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी हा निधी वर्ग केला आहे अशी माहिती भाजप जिल्हा परिषद सदस्य व गटनेते जालिंदर  वाकचौरे यांनी दिली.
प्रवरा नदी लाभक्षेत्रात असलेली गावे परंतु पाण्यापासून वंचित राहणारी गावे त्यामध्ये कुंभेफळ, तांभोळ, गर्दनी, टाकळी, ढोकरी, अंबिकानगर, बहिरवाडी, मेहेंदुरी,  उंचखडक, आंबड, धामणगाव आवारी, परखतपुर, वाशेरे, मनोहरपूर, कळस बुद्रुक व कळस खुर्द या गावांना या उच्चस्तरीय कालव्याचा फायदा होणार आहे.
अकोले तालुक्यातील भाजप, शिवसेना, माकप, रिपाई यांनी आंदोलन करुन कालव्यांना मंजुरी मिळवली. मागील सरकारने मंजुरी दिली मात्र निधी दिला नाही.  त्यामुळे ही कामे रखडली होती. पावसाळ्यात धरण भरल्यानंतर या पाण्यातून गावचे बंधारे भरले जाणार आहे. यामुळे विहिरींची पाणीपातळीत वाढेल.