Breaking News

दंडाची रक्कम पीओएस मशिनने गोळा करण्याचे वाहतूक पोलिसांचे नियोजन

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : देश कॅशलेस करण्याची मोदी सरकारची धडपड सुरु असल्याचे दिसून येत आहे. मग आपल्या दैनंदिन व्यवहारापासून, पेट्रोल, रेशनिंग  तसेच छोट्यातल्या-छोट्या दुकानांनी कॅशलेस सुविधा स्वीकारली. आता पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेली रक्कम पोओएस मशिनच्या सहाय्याने जमा केली  जाणार आहे. 
नोटाबंदीनंतर सुरु झालेल्या कॅशलेस इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सातारा शहर वाहतूक पोलीस विभागाने घेतला. नियमभंग करणार्‍या चालकांकडून  दंडाची रक्कम स्वीकारण्यासाठी स्वाइप मशिनचा वापर करण्यात येणार आहे. तर रोख रक्कम नसलेल्यांकडून कार्ड पेमेंटद्वारे दंड स्वीकारण्यात येणार. यासाठी  पीओएस मशीनचा वापर करण्यात येणार असल्याची आहे. कॅशलेस मोहिमेचा ठराव लवकरच वरच्या पातळीवर पाठविला जाणार असल्याचे सातारा शहर वाहतूक  पोलीस निरीक्षक घाडगे यांनी सांगितले आहे. एकंदर सातारा वाहतूक पोलिसांनी ई-चलन उपक्रम राबवणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नियमभंग करणार्‍या  चालकांकडून दंडाची रक्कम स्वीकारण्यासाठी स्वाइप मशिनचा प्रायोगिक तत्वावार वापर करण्यात येणार आहे. रोख रक्कम नसलेल्यांकडून कार्ड पेमेंटद्वारे दंड  स्वीकारण्यात येणार आहे. तर यासाठी पीओएस मशिनद्वारे संपूर्ण दंड वसूली सुरु झाल्यानंतर वसुलीतील गैरव्यवहाराला लगाम लागेल, अशी अशा व्यक्त होत आहे.