Breaking News

खिरवीरे गणात भाजपची शिवार संवाद सभा

अकोले, दि. 27 - भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर राबविण्यात येणार्‍या शिवार संवाद सभाचे दुसरे दिवशी अकोले तालुक्यात सर्व पंचायत समिती गणात  सभा घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला असल्याची माहिती भाजप जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली.
श्री. वाकचौरे यांनी खिरविरा गणातील कोंभाळणे येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे दिनेश शहा शंकर सदगीर हे उपस्थित होते. जेष्ठनेते अशोकराव  भांगरे यांनी वारंघुशी गणातील रंधा गावातील शेतकर्‍यांना भेटी देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पं. स. सदस्य अलका अवसरकर या सहभागी झाल्या  होत्या. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी साकिरवाडी, केळी कोतुळ, कोतुळ या गावांमध्ये संवाद साधला. तेथे शेतकरी सभा घेतल्या.  जि.प. सदस्य सुनीता भांगरे  यांनी गणोरे गणातील सुगाव खुर्द येथे महिला बचत गटातील महिलांना भेटी दिल्या. जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे हे समशेरपूर गणातील केळी रुम्हणवाडीत  आदिवासी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. तालुका चिटणीस शंकर सदगीर, योगेश जाधव आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष भाऊसाहेब  वाकचौरे यांनी राजूर गणातील जामगाव व विठे येथील तरुण शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके, भाजप सरकारची  कामगिरी समजून सांगितली. नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांनी वाशेरे येथे शेतकरी सभा घेतली. यावेळी युवा अध्यक्ष ईश्‍वर वाकचौरे, महिला आघाडी जिल्हा  सरचिटणीस लताताई देशमुख, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र पानसरे हे उपस्तिथ होते. पं. स. सदस्य दत्ता देशमुख यांनी गणोरे गणातील वीरगाव व गणोरे गावात आपला  संपर्क साधला. पं. स. सदस्या उर्मिला राऊत यांनी धामणगाव गणातील मोर्चेवाडी विठा या गावातील शेतकर्‍यांशी संवाद साधला. राजाराम राऊत यांनी शेतकर्‍यांच्या  प्रश्‍नावर उत्तर दिली. भाजप शहर अध्यक्ष धनंजय संत यांनी कोतुळ गावात शिवार सभा घेतली. भाजप तालुकाउपाध्यक्ष प्रकाश कोरडे, विठ्ठल कानवडे यांनी  ब्राम्हणवाडा गणातील पिंपळदरीत जनतेची मते जाणून घेतली.
शेतकरी अडचणीत आहे त्याला कर्जमुक्ती देण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव द्यावा अशा मागण्याबरोबर काँग्रेसवाले कधी शेतकरी भेटीला आले नाही मात्र भाजपवाले  भेटायला तरी आले अशी समाधान व्यक्त केले.