घरघुती वादातून व्यसनाधिन पतीचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न
बुलडाणा, दि. 25 - दारूचे व्यसन आणी कामधंद्यांचा आळस यातुन सतत घडणार्या घरघुती वादातून पतीने पत्नीस विहीरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार बबन भंडारे व रंजना भंडारे हे पती पत्नी रा.शेलूद ता.चिखली येथील रहिवासी असून शेतमजुरी व इतर मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र पतीला दारुचे व्यसन असल्याने घराचा भार हा पत्नी रंजना भंडारे यांच्यावरच जास्त आहे. या करणामुळे दोघा पती पत्नीत सतत भांडणे होत राहायचे. घटनेच्या दिवशी शेतातून घरी जायला उशीर झाल्याने दोघा पती पत्नीने शेतातच मुक्काम करण्याचे ठरविले. सकाळी उठल्यानंतर पाणी काढण्यासाठी रंजना भंडारे ह्या जवळील विहीरीवर गेल्या असता आरोपी बबन भंडारे याने मागुन धक्का दिला आणि विहीरीत पडल्यानंतर वरुन दगडांचा मारा करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे रंजना भंडारे यांनी सांगितले.
याबाबत रंजना भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलीसांनी आरोपी बबन भंडारे यांच्याविरुध्द भादंवि कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.