वाळू माफीयांचा शासनाच्या लाखो रुपयांवर डल्ला!
अधिकार्यांची कार्यवाही ऐवजी वाळु माफीयाला पाठीशी घालण्यातच धन्यता
बुलडाणा, दि. 25 - नियम व अटी धाब्यावर बसवून सर्रासपणे वाळू माफीयांनी अवैध गौणखणीजांचे उत्खनन सुरू केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याने याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी कारभारी मुळे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, आकाश सुर्यवंशी यांच्याकडे रेती घाट आहे. रेती स्थळ करारपत्रातील विशेष निर्देश, अटी, शर्ती व नियमांचे पालन न करता रेतीची सर्रासपणे चोरी करून बेकायदेशीर उतखनन केल्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसुल बुडाला असुन निसर्गाची हानी झाली आहे. रेती घाटाच्या ठिकाणी सिमेंटचे पोल्स चार कोपर्यांवर व मध्यभागी रोवलेले नाहीत. ज्या ठिकाणची सिमा दर्शविली नाही. तसेच ठेकेदाराचे नांव व पत्ता जागेचा तपशिल दर्शविणारा फलकही लावलेला नाही. वाहतुकच्या वाहनावर स्पष्टपणे गाडीचा नंबर व फलक लिहलेले नाही. रेती वाहतुकीसाठी नेमुण दिलेल्या रस्त्याने वाळु वाहतुक न करता त्यांचे सोई प्रमाणे वाळु वाहतुक करित आहेत.
रेतीची वाहतुक करित असतांना त्यावर प्लास्टीकचे पेपरने किंवा ताडपत्रीने आच्छादीत करूनच वाळु वाहतुक करावी असा कडक नियम असतांना देखिल त्यावर कोणत्याही प्रकारची ताडपत्री झाकल्या जात नाही. त्यामुळे छोटे छोटे वाळुचे कण प्रवासा दरम्यान लोकांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यांच्या आजाराची समस्या उद्भवत आहे. रेतीची वाहतुक करणार्या हायवा, व ट्रक व्दारे चार तेक पाच बरास ची चोरी करत असुन केवळ दोन बरास ची पावती रेकॉर्डला दाखविली जाते. सदरील पावत्या देखिल बोगस बनविल्या जात असुन त्यावर वाहतुकीचे अंतर, वाहन क्रमांक व वाहन कोठुन कोठे जाते हे नमुद केलेले नाही. तसेच तिन ते चार फुट लांबीची लाकडी व लोखंडी फळी लाऊन संबंधित वाहनामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाळुची वाहतुक करून राजरोसपणे चोरी केल्या जात आहे. लिलावधारक हा निर्धारित केलेल्या वेळेपेक्षाजास्त वाळु वाहतुक करून तस्करी करीत आहे.
खडकपुर्णा नदी पात्रात ड्रेझरव्दारे/बोटव्दारे रेती उत्खननाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसतांना विहीर केलेल्या खोलीपेक्षा जास्त, किंवा मंजुर केलेल्या वाळु घाटापेक्षा जास्त अवैध रित्या गौण खनिज रेतीचे उत्खनन चालु आहे. त्यामुळे जलजिवन व जलसंपत्तीस धोका पोहचुन, पर्यावराची व निसर्गाची मोठी हानी होऊन नैसर्गीक संपत्ती व पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.