पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी गजाआड
कल्याण, दि. 26 - ठाणे पोलीस आयुक्तालयादीत टॉप 20 वॉन्टेड आरोपी असणार्या दोघा अट्टल गुन्हेगारांना कल्याण पोलीस उपयुक्तांच्या अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडने मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इराणी वस्तीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातील एका आरोपीचाही यात समावेश आहे.
मम्मू उर्फ वसीम इराणी आणि सैय्यद इराणी अशी या दोघा अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. हे दोघेही ठाणे पोलीस आयुक्तांच्या टॉप 20 वॉन्टेड यादीतील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळात अँटी चेन स्नॅचिंगविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे चेन स्नाचिंगला बर्यापैकी आळा बसला आहे. त्यामुळे या इराणी आरोपींनी आता आपला मोर्चा महागडे मोबाईल आणि बाईकचोरीकडे वळवला होता, असे उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. हे आरोपी वेगवेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या बाईक्स हेरून ठेवायचे आणि नंतर त्या पळवून न्यायचे. तसेच फिरायला आलेल्या लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून बाईकद्वारे धुम ठोकायची यांची मोडस ऑपरेंडी होती, असेही उपायुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले.