सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली, दि. 26 - केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी रणजित सिन्हा यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागानेच गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणातील आरोपींच्या भेटी घेऊन हा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न आणि या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने न करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मांस निर्यातक मोईन कुरेशीसह केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ए. पी. सिंग यांच्याविरोधात विभागाने यापूर्वी गुन्हा दाखल केला होता. सिन्हा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. सिन्हा यांच्या चौकशीसाठी तीन सदस्यांचे विशेष तपास पथकही सर्वोच्च न्यायालयाने नेमले होते.