लाचघेतल्या प्रकरणी आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
पुणे, दि. 26 - थेरगाव येथील 11 मजली इमारतीच्या बांधकामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी बिल्डरकडून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे.
राजेंद्र सोपान शिर्के (वय 45, रा. पिंपळे निलख) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 63 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्या बिल्डरचे थेरगाव येथे 11 मजली इमारत बांधली आहे. त्यातील 7 मजल्यांच्या पुर्णत्वाचा दाखला महापालिकेकडून देण्यात आला आहे. उर्वरित चार मजल्याचा बांधकामाचा पुर्णत्वाचा दाखला मिळवून देण्यासाठी शिर्के याने त्या बिल्डरकडे तडजोडीअंती 12 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देणे बिल्डरांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने कारवाई करत शिर्के याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी शिर्के याचे बँकेत लॉकर असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी तसेच या गुन्ह्यात आणखी क़ोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे ड. प्रताप परदेशी यांनी काम पाहिले.