शेततळ्याची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी
जालना, दि. 21 - शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पोलीस जवानांनी उभारलेल्या शेततळ्याची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. या वेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य हरिदास मुंडे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन देशाच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जवान दक्ष असतात. जवानांप्रती शासन सहानुभूतीपूर्व व सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या शेततळयामुळे येथील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असुन परिसरात वृक्षांचे संगोपन करणेही सोईचे झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यात आला असल्याचे सांगत पोलिसांना पक्क्या व सर्व सोईंनीयुक्त घरांसाठी शासनाने 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन या कामाच्या निविदाही अंतिम करण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य हरिदास मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपुजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक पी. एस. ठाकूर, उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, 2 भाऊ, बहीण, पत्नी, मुलगी व मुलगा असा मोठा परिवार आहे.