Breaking News

शेततळ्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमीपूजन

बीड, दि. 21 - बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे जलयुक्त शिवार अभियानातर्गंत डोबरी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम करण्यात आले असून या कामाची पाहणी करून शेततळ्याचे जलपूजन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या यांत्रिक विभागाकडून डोबरी नदी खोलीकरणाचे काम करण्यात आले असून या नदीचे जवळपास दीड कि.मी. खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शहाबाजपूर येथील शेतकरी अशोकराव गोरे, दिलीप गोरे यांच्या शेतीमध्ये 60-60 मीटर आकाराचे शेततळे तयार करण्यात आले असून या शेततळ्यास शासनाकडून 5 लाख 39 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मोठा जलसाठा निर्माण झाला असून या शेततळ्याचे जलपूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
डोबरी नदी खोलीकरण शेततळे जलपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, माजी आमदार बदामराव पंडित, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे उपस्थित होते.