मुंबई, जालंधर, बिजनौरमधून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
मुंबई, दि. 20 - पाच राज्यांमधील पोलिसांच्या साथीर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तीन संशयितांना दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. या संशयितांना मुंबई, जालंधर व बिजनौरमधून अटक करण्यात आली आहे. याशिवाय बिजनौरमधील बजरावालामधून तन्वीर व फैजान मुफ्ती या संशयितांनाही अटक केली आहे.या मोहिमेसाठी उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई, जालंधर, बिहारमधील नरकटियागंज, बिजनौर व मुजफ्फरनगर पोलिसांची मदत घेतली. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या 6 जणांची चौकशी केली जात आहे. दहशतवादी काही नव्या सदस्यांच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील दहशतवाद विरोधी पथकाने दिल्ली पोलीस व आध्र प्रदेश पोलिसांचे विशेष पथक, महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथक, पंजाब व बिहार पोलीस यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.