Breaking News

अहमदनगरला ’नीट’चे केंद्र मंजूर

अहमदनगर, दि. 20 - 12वी परीक्षेनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशा करिता नीट ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. यंदाच्या वर्षी या परीक्षेसाठी देशात एकूण 23 नवीन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये अहमदनगरचा ही समावेश करण्यात आला आहे.नीट परीक्षेकरिता चे केंद्र अहमदनगरला सुरू करण्याचा निर्णय झाल्याने हजारो विद्याथ्र्यांना याचा फायदा होणार असून पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
7 मे 2017 रोजी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) संपूर्ण देशभर नीट या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नीट परीक्षेसाठी या पूर्वी महाराष्ट्रात नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाणे ही 6 परीक्षा केंद्र होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक किंवा मुंबई येथे जावे लागत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांचे पैसे खर्च होऊन विद्याथ्र्यांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जात असे. बहुतेक जणांना परीक्षेच्या अगोदर एक दिवस परीक्षेच्या ठिकाणी मुक्कामासाठी जावे लागत असे. नगर जिल्ह्यातून सुमारे 20 हजाराहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षा देत असतात. आता नीट परीक्षेकरिताचे केंद्र अहमदनगर येथे मंजूर झाले असल्याने 20 हजाराहून अधिक विद्याथ्र्यांची सोय झाली असून पालकांचा खर्च देखील वाचणार आहे.त्याबरोबरच शेजारच्या बीड जिल्ह्यातील विद्याथ्र्यांची देखील जवळचे परीक्षा केंद्र मिळाल्याने मोठी सोय होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.