Breaking News

नागपूरमध्ये पीएसआयवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नागपूर, दि. 20 - येथील पीडितेने तक्रार केलेल्या पोलीस उप-निरीक्षकावर(पीएसआय) अखेर मारहाण, विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उप-निरीक्षकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरुन उठणार नाही असे म्हणत पीडिता मागील चार दिवसांपासून आंदोलन करत होती. आता तिच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून पोलीस उप-निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र पोलीस उपनिरिक्षकाच्या तरुन पीडित तरुणीविरोधातही घरात घुसून मारहाण करणे, धमकावणे यासांरखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या पोलीस उप-निरीक्षकाने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला असल्याचा आरोप पीडितेने केला होता. या पीडित महिलेने 2016 साली पोलीस अधिकार्‍याविरोधात बलात्कार केल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र आजवर या पोलिसाविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले नव्हते.