चव्हाण बंधूंच्या आत्महत्येची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे - आ. चव्हाण
कराड, दि. 6 (प्रतिनिधी) - आत्महत्या केलेल्या वडगाव हवेलीच्या चव्हाण बंधूंच्यामागे गेल्या महिन्याभरापासून बँकांचा पठाणी पध्दतीने तगादा सुरु होता. आलेल्या फोनवरील संवादही (कै.) जगन्नाथ चव्हाण यांनी रेकॉर्ड केले आहेत. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. कॉल रेकॉर्ड उघड झाले पाहिजे. राज्य सरकारने कर्जमाफीबाबातचा मद्रास न्यायालयाचा निकाल पाहून तामिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या धर्तीवर आपल्याही राज्यातील अल्पभूधारक शेतकर्यांचे सर्व कर्ज माफ करावे. असा आग्रह माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. वडगाव हवेली (ता. कराड) येथील कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या (कै.) जगन्नाथ व विजय कृष्णा चव्हाण यांच्या कुटूंबियांचे आ. चव्हाण यांनी भेटून सांत्वन केले. त्यानंतर ते बोलत होते.
आ. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण मतदारंघातील ऐन उमेदीतील दोन तरुणांनी आत्महत्या केली. यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत हृदयविदारक ही घटना आहे. ऐन तारुण्यातील सख्ख्या भावांना साडेतीन एकर जमीनीमधील उत्पन्नास योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे एकाने कृषी, बियाणे, कृषी निविष्ठा विक्रीचे दुकान सुरु केले. तर दुसर्याने एमआयडीसीत जागा घेऊन पशुखाद्य निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. यासाठी बँकांची कर्जे घेतली होती. मागील कालावधीतील मंदीमुळे दुग्ध व्यवसाय कोसळला. त्यामुळे त्यांच्यावर एकीकडे खूप मोठे कर्ज होते. दुसरीकडे शेतीत पोट भरत नव्हते. त्यांना दोन बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता. त्या बँकांचे काही अपप्रकारही पुढे आले आहेत. ते पोलीस चौकशीत निष्पन्न होतील. तेवढ्यामध्ये त्यांना कलकत्त्याच्या एका व्यक्तीने कमी व्याजदराने पाच कोटीचे कर्ज देतो म्हणून फूस लावली. दोघांकडून 25 लाख कमीशन लुटून तो फरार झाला. व पाच कोटीचा खोटा चेक दिला. इंडक्शन कुकर नावाच्या कंपनीद्वारे कलकत्त्याच्या व्यक्तीने परिसरातील आणखी काही लोकांना फसवले आहे का हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीस शोधून आणून त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह आहे.
या प्रकरणामध्ये मोठ्या लोकांचा समावेश असेल, तर त्यांचीही गय करु नका. या होतकरु भावांच्यामागे महिन्याभरामध्ये कर्जवसुलीसाठी पठाणी पध्दतीने तगादे सुरु झाले होते. आलेले फोन जगन्नाथ याने रेकार्ड केले आहेत. अनेक प्रकारचे फोन आहेत. पोलिसांकडून या सर्व प्रकारणाची पारदर्शकपणे चोकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तशाच पध्दतीने कॉ्ल रेकॉर्ड उघड झाले पाहिजे. कलकत्त्यातील मांजी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्याला खेचून आणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कृषी अधारीत उद्योग व्यवसायामध्ये त्रास होत असताना आत्महत्या करणे दुर्देवी आहे. कृषी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. शेतकर्यांना किफायतशीर दर मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शेतकर्यांना मिळणार्या उत्पादनावर 50 टक्के नफा दिला पाहिजे. संर्घष यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकारवर दबाव आणत आहोत. मद्रास न्यायालयाचा कर्जमाफीचा निकाल सरकारने पहावा. तामिळनाडू सरकारने गेल्यावर्षी दिलेली कर्जमाफी व नुकतीच युपी सरकारने केलेली कर्जमाफी याचा विचार करुन सरकारने कोणतेही निकष न पाहता महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकर्यांचे सुमारे साडेतीस हजार कोटीचे कर्ज माफ केले पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
त्याआधी आ. चव्हाण यांनी चव्हाण भावंडांच्या रक्षाविसर्जन विधीस उपस्थित राहून श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्याकडे या प्रकरणातील कागदपत्रे पडताळून चौकशी केली. आत्महत्या करण्यास जबाबदार ठरलेल्या कलकत्त्याच्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यास खेचून आणण्याबाबत सुचित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, इंद्रजीत चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील, माजी उपसरपंच संतोष जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.