Breaking News

अवैध धंद्या विरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

बुलडाणा, दि. 14 - धाड पोलिस स्टेशन हद्दित सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील जांब, दुधा, धामनगाव, मोंढाळा, म्हसला, ईर्ला यासह इतर गावातील ग्रामस्थांसह महिलांच्या वतीने आज 13 एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमुद केले की, मागील काही दिवसापासून धाड पोलिस ठाण्याच्या हद्दित येत असलेल्या जांब, दुधा, धामनगाव, मोंढाळा, म्हसला, ईर्ला यासह इतर गावात अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे. गावागावात वरली, क्लब व राजरोसपणे देशी व गावठी दारूची विक्री करण्यात येत आहे. गावातील असंख्य युवक दारूच्या आहारी जात आहेत. शिवाय या अवैध धंद्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दारूमुळे महिलांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. या दारूचा सर्वािधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये चोर्‍याचे प्रमाण सुध्दा वाढीस लागले आहे. त्यामुळे धाड पोलिस ठाण्याच्या हद्दितील अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, या मागणीसाठी जांब, दुधा, धामनगाव, मोंढाळा, म्हसला, ईर्ला या गावातील नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अशोक संतापे, विभाग प्रमुख उध्दव भोंडे, राजु गायकवाड, गजानन धंदर, प्रताप वाघ, सुनिल दांडगे, राजेंद्र भोंडे, यशोदाबाई शेळके, अनुसया बावस्कर, कमला बावस्कर, अनिता जाधव, जिजाबाई खरात, शांता भोंडे, सुला भोंडे, कमल भोंडे, पदमाबाई म्हस्के, शंशीकला बावस्कर, मणकर्णा बावस्कर, हौसाबाई खंडाळे, कांता बावस्कर, लता जवरे, लक्ष्मी भोपळे, मंडाबाई चवरे, वैशाली चवरे, चंद्रकला सोनुने, रत्ना जाधव, छाया इंगळे, लता खंडारे, सगीता नरवाडे, गजानन सोनुने, कडूबाई वाकोडे, विमल भोंडे यांच्यासह असंख्य महिला व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.