मध्यप्रदेशमधील आदिवासींची मागणी
भोपाळ, दि. 21 - काश्मीरमध्ये निदर्शकांकडून केल्या जाणार्या दगडफेकीविरोधात गोफण या पारंपारिक पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी मध्य प्रदेशमधील एका गटाने पंतप्रधानांकडे केली आहे.काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीचे व्हिडिओ व छायाचित्रे पहाता सुरक्षा रक्षक असहाय्य असल्याचे दिसतात. गेल्या काही महिन्यांत दगडफेकीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा वापर करून निदर्शकांचा सामना करावा, असे मध्य प्रदेशच्या झाबुआ या आदिवासी बहुल जिल्ह्यातील भिल्ल युवकांचे म्हणणे आहे. दगडफेकीला दगडाच्या माध्यमातून प्रत्त्युत्तर देता येईल, असे भानु भुरिया या आदिवासी युवकाने म्हटले आहे. यासाठी गोफण बटालियनही तयार करण्याची गरज आहे, असेही भुरिया यांनी सांगितले.