Breaking News

नागपुरात आमदार निवासात बलात्कार; दोघांना अटक

नागपूर, दि. 21 - येथील आमदार निवास इमारतीत सलग तीन दिवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रजत मंढरे व मनोज भगत या दोन जणांना अटक करण्यात आले आहे. यामुळे आता आमदार निवासातील सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.
अमरावती मार्गावरील सिव्हील लेन परिसरातील आमदार निवासाच्यक्र. 301 मध्ये सराफा व्यापारी व त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदाराची चिठ्ठी असल्याशिवाय आमदार निवासात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. मग आता हा प्रकार कसा घडला व कोणत्या आमदाराच्या चिठ्ठीने हे तेथे आले याचा तपास सुरू आहे.