Breaking News

इमानचे वजन कमी झाल्याचे ध्वनीचित्रफित प्रसिद्ध

मुंबई, दि. 21 - इमान अहमद हिचे वजन कमी झाले असून ती आता बर्‍याच वेळ व्हिलचेअरमध्ये बसू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. काल डॉक्टरांनी एक ध्वनीचित्रफित प्रसिद्ध केले असून यात इमान वजन कमी झाल्यामुळे आनंदी दिसत आहे.
इमानवर चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू असून गेल्या दोन महिन्यात तिचे 250 किलोनी कमी झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इमान कधी व्हिलचेअर बर्‍याच वेळ बसू शकते, अशी कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.