दोन विमानांचा अपघात टळला; चौकशीचे आदेश
वाराणसी, दि. 21 - लाल बहादुर शास्त्री विमानतळावरुन 33 हजार फूट अंतरावर हवेमध्ये दोन प्रवासी विमानांचा अपघात थोडक्यात टळला आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. इंडिगो एअरलाईनचे विमान दिल्लीहून बागडोगरा येथे चालले होते. तर एअर एशियाच्या आय5-768 या विमानानेही दुपारी बागडोगरा येथून दिल्लीसाठी उड्डाण केले होते.
दोन्ही विमाने एकाच मार्गावर 9 किलोमीटर दूर अंतरावर असतांना दोन्ही विमानांमध्ये एअरबोर्न कलिजन अवायडेंस सिस्टीमने धोक्याचा इशारा दिल्याने दोन्ही वैमानिकांनी आपला मार्ग बदलल्यामुळे होणार अपघात टळला आहे. मात्र या प्रकारामुळे हवाई वाहतूक महासंचालनालयाने तपासाचे आदेश दिले आहेत.