समाजाचे काही देणे लागते या प्रामाणिक भावनेतून कार्य केल्यास निश्चित यश चांगले मिळते ः इंजि.अनिस
अहमदनगर, दि. 25 - ज्या पद्धतीने निसर्गातील विविध वस्तू या जगात काही ना काही मोलाचे समजोपयोगी कार्य नैसर्गिकरित्या करत असते व त्या मोबदल्यात कुठलीही अपेक्षा बाळगत नाही. जसे एखादे मोठे झाड आपल्याला सावली देते, ऑक्सिजन देते, फळ, फुल देते तसेच मनुष्यजन्मी समाजाला आपण काही देणे लागतो, या प्रामाणिक भावनेतून आपण काम केल्यास, निश्चितच चांगले यश प्राप्त होते, असे प्रतिपादन मिनर्व्हा इन्फ्राचे प्रमुख इंजि.अनिस शेख यांनी केले.
अहमदनगर सोशल क्लबच्यावतीने शहीद स्वलेह जावेद बकाली यांच्या शहिद दिनानिमित्त सिव्हील हॉस्पिटल येथे आयोजित अन्नदानप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अनिस शेख बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष माने, रफिक कादर शेख मेजर, सय्यद अफजल पिरजादे, अनजर खान, सय्यद शाह फैसाल आदि यावेळी उपस्थित होते. या पुण्याच्या अन्नदान वाटप कार्यक्रमास हातभार लावावा व अहमदनगर सोशल क्लबला सहकार्य करावे.