नागरिकांचे विविध मागण्यांसाठी मुंडन आंदोलन
नाशिक, दि. 20 - घरांना घरपट्टी लागू करावी,रवठ्याची सुविधा पुरवावी, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक शहरातील नागरिकांनी महापालिकेवर मुंडन करत मोर्चा काढला. या मोर्चात गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिक सहभागी झाले. यावेळी काही नागरिकांनी मुंडन करत महापालिकेचा निषेध नोंदविला.शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शालीमारमार्गे राजीव गांधीभवनावर नेण्यात आला. संबंधित परिसरातील वसाहतींना घरपट्टी त्वरित लागू करावी, ज्यांचा जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत घरकुलाला विरोध आहे, त्यांना ठिकाणीच घरकुले देण्यात यावीत, वंचित लोकांचा सर्वे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करून घ्यावे, वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले. तत्पूर्वी, राजीव गांधीभवनासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.