Breaking News

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : संचालक, आपत्ती व्यवस्थापन आणि एन. डी. आर. एफ, पुणे यांच्या मार्फत दि. 16 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विषयी प्रशिक्षण, जनजागृती व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी दिली आहे.
दि. 19 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरु नवोदय विद्यालय, खावली येथे नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीचे निवारण या विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 20 एप्रिल रोजी तहसील कार्यालय कराड येथे भूकंप व संभाव्य पूर तसेच नदीपात्रात बोटीचे स्कुबा ड्रायविंगचे प्रात्यक्षिक. 21 एप्रिल रोजी तहसील कार्यालय खंडाळा येथे हायवे मार्गालगतच्या गावातील युवक, ग्रामस्थ, स्वयंसेवक, खंडाळा आणि शिरवळ पोलीस स्टेशनमधील कर्मचार्‍यांसाठी रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना आणि मदत याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 22 एप्रिल रोजी मॉक ड्रील 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अनिरुध्दाज अ‍ॅकॅडमीचे स्वयंसेवकांसाठी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण. 24 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत मधील अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शहरी भागातील आपत्ती, दुर्घटना व त्याचे निवारण व प्रात्यक्षिके. 25 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कर्वे, ता. कराड येथे युवक मंडळातील तरुण, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी पूर, भूकंप, रस्ते अपघात विषय प्रशिक्षण. 26 एप्रिल रोजी तहसील कार्यालय किंवा नगरपालिका हॉल, महाबळेश्‍वर येथे गाव आपत्ती समिती सदस्य, नगरपालिका कर्मचारी, पोलीस युवक मंडळे व स्वयंसेवकांसाठी दरड कोसळणे, भूकंप, आग, घाटातील अपघात इत्यादी आपत्तीचे निवारण करण्यासाठी प्रशिक्षण. 27 एप्रिल रोजी काडसिध्देश्‍वर मठ, परळी, जि. सातारा येथे जिल्ह्यातील युवक व स्वयंसेवक यांच्यासाठी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीबाबत नियोजन विषयी प्रशिक्षण. 28 एप्रिल रोजी तहसील कार्यालय पाटण येथे संभाव्य नदीकाठावरील पूरप्रवण व भूकंपप्रणव गावातील गावस्तरीय समिती सदस्य व नगरपालिका कर्मचार्‍यांसाठी भूकंप व संभाव्य पूर या विषयी प्रशिक्षण. 29 एप्रिल रोजी तहसील कार्यालय वाई (पंचायत समिती हॉल वाई) गाव आपत्ती समिती सदस्य, नगरपालिका कर्मचारी, पोलीस, युवक मंडळे व स्वयंसेवक यांच्यासाठी पूर, भूकंप, आग, रस्ते अपघात आपत्तीचे निवारण विषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.