अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!
बुलडाणा, दि. 26 - महावितरणबाबत वारंवार येणार्या तक्रारी गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडक कारवाई केली. बुलडाण्यातील एका अभियंत्याचं निलंबन आणि 7 अभियंत्यांची वेतनवाढ रोखली आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडक कारवाईमुळे महावितरणसह ऊर्जा विभाग संपूर्ण हादरुन गेले आहे. लोकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कारवाईतून दिला आहे. बुलडाण्यात महावितरणच्या कार्यलायात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार भरवला होता. यामध्ये लोकांच्या तक्रारी थेट ऊर्जामंत्र्यांनी ऐकल्या. कुठल्याही प्रकारची चूक किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जनता दरबारातील कारवाईवरुन प्रशासनाला देण्यात आला आहे.