प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) : भारतातील नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षिततेची योजना म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत जास्तीत-जास्त सहभाग वाढविण्यासाठी महावितरणकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजनांचा कालावधी प्रत्येक वर्षासाठी 1 जून ते 31 मे असा राहणार आहे. विमा रक्कम प्रत्येकी रुपये 2 लाख एवढी आहे. दोन्ही योजनांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आवश्यक आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट 18 ते 70 वर्षे आहे. यात कर्मचार्याने केवळ 12 रुपये एवढा वार्षिक विमा हप्ता भरायचा असून कर्मचार्यांस अपघात झाल्यास त्याला दोन लाखांपर्यंत विमा रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत कर्मचार्याला 330 रुपये एवढा वार्षिक विमा हप्ता भरावयाचा असून या योजनेमध्ये वयाची अट 18 ते 50 वर्षे आहे. या कालावधीत कर्मचार्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितास 2 लाख रुपये देय आहे. दोन्ही योजनांची सविस्तर माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून कर्मचार्यांनी योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.