Breaking News

कार्वे नाका येथे घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) : कार्वे नाका येथील चव्हाणनगरमधील अशोक आबासाहेब चव्हाण (मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. 
कराड तालुक्यातील पश्‍चिम सुपने येथील अशोक चव्हाण हे कार्वे नाका येथे वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी काही कामानिमित्त घर बंद करुन ते कुटुंबीयांसह सुपने येथे गेले होते. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात असलेली अंगठी, लॉकेट व एलईडी टीव्ही असा 90 हजारांचा ऐवज त्यांनी लंपास केला. चव्हाण यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजारच्या लोकांनी फोन करून चव्हाण यांना सांगितले. चव्हाण यांनी घरी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.