Breaking News

पृथ्वीचं बदललेलं रुप ’नासा’च्या कॅमेर्‍यातून!

वॉश्गिंटन, दि. 14 - अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघत असेल याची आपण कल्पना केली असेल. पण नासानं हे कल्पनेतलं चित्र वास्तवात टिपलं आहे. ‘अर्थ अ‍ॅट नाईट’ या शीर्षकाखाली अंधार्‍या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा नासानं समोर आणला आहे. झपाट्यानं होत असलेल्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा चेहराच बदलला आहे. जंगलं नाहीशी होऊन त्याजागी इमारती उभ्या राहात आहेत. हेच बदललेलं पृथ्वीचं रुप नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी कॅमेर्‍यात कैद केलं आहे.
2012 साली पृथ्वीचं अंधार्‍या रात्री दिव्यांनी उजळून निघणारं दृश्यं नासानं टिपलं होतं. हे छायाचित्र तेव्हा खूप व्हायरल झालं होतं. आता दररोज हा नकाशा अपडेट करण्याचा नासाचा प्रयत्न आहे. कोणत्या शहरात लोकसंख्या वाढली आहे हे फोटो दाखवतात असं नासाचं म्हणणं आहे. दरम्यान, नासानं 2012, 2016मध्ये अशीच दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला होता.