Breaking News

अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तिशाली बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन, दि. 14 - अमेरिकन मिलीट्रीने अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील आयसिस स्टेटमध्ये अमेरिकेने हा हल्ला केल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकन फायटर MC-130 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या नांगरहार भागातील आयसिसच्या गुहांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला.
अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. आयसीसचा सुळसुळाट असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला. MO-B (Mother Of -ll Bombs) हा जगातील सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र विरहीत बॉम्ब अमेरिकेने वापरला आहे. आयसीसचे अड्डे उद्ध्वस्त करणं या हल्ल्यामागचा उद्देश असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकन सैन्य सध्या अफगाणिस्तानातील नुकसानीची पाहणी करत आहे. MO-B चा वापर जगात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
MO-B म्हणजे   "Mother of -ll Bombs' हा जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. याला ॠइण-43/इ या नावाने ओळखलं जातं. 11 टन वजनाची शस्त्रे या GBU असून याचं वजन 9 हजार 797 किलो म्हणजे जवळपास 100 टन एवढं असल्याचं बोललं जातं.  वायू दलाने हा बॉम्ब 2003 साली तयार केला, पण आतापर्यंत याचा वापर कधीही करण्यात आला नव्हता. अमेरिकेचं सैन्य मुख्यालय असलेल्या पेंटागनने या हल्ल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. अमेरिकन फायटर MC-130 च्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या नांगरहार भागातील आयसिसच्या गुहांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही, अशी माहिती पेंटागनचे प्रवक्ते अ‍ॅडम स्टंप यांनी दिली.