कुलभूषण जाधवप्रकरणी भारत चिंतित : परराष्ट्र मंत्रालय
नवी दिल्ली, दि. 21 - माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सुरू असलेली सुनावणी आणि अपील प्रकियेसंबंधित माहिती भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी दिली. या प्रकरणी भारत चिंतित असून त्यांना पाकिस्तानमध्ये कोठे ठेवण्यात आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जाधव यांची माहिती देण्याबाबत भारताने तब्बल 15 वेळा पाकिस्तानकडे विनंती केली आहे, असेही बागले यांनी सांगितले.
जाधव यांच्यासाठी राजनैतिक आणि त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या सुनावणी प्रक्रियेची माहिती भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे. भारत पाकिस्तानच्या औपचारिक उत्तराच्या प्रतिक्षेत आहे, असे बागले यांनी सांगितले.