Breaking News

कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होत असेल तर आपल्यासारखे करंटे आपणच - मुख्यमंत्री

पुणे, दि. 20 - कर्जमाफी केल्यानंतरही जर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार असेल तर आपल्यासारखे करंटे आपणच. त्यामुळे कर्जमाहीसोबतच शेतकर्‍यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. भाजप सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला असून मागील वर्षी सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बदल झाले आहेत. जलयुक्त शिवार सारखी योजना राबविण्यात जलयुक्त आर्ट ऑफ लिव्हिंग, दिलासा फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशन यांच्यासारख्या सामाजिक संस्थांच्या योगदानामुळे  हे शक्य झाले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी हल्ला विरोधी सरंक्षण कायदा केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (बुधवारी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना त्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम  पुणे येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,ऑल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे समूहाचे संपादक दिनकर वायकर आदी उपस्थित होते.