महात्मा फुले यांच्या विचाराची समाजाला गरज
अहमदनगर, दि. 14 - संपूर्ण कुटूंबाला सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे फुले दाम्पत्यांना समजले होते. त्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आणि पुण्यात स्त्री शिक्षणाची पहिली शाळा उघडली. त्यांच्या कार्याचा वसा अनेकांनी पुढे चालविला. महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी दिपस्तंभासारखे आहे. महिला हीच समाजाची खरी अर्धांगिनी आहे, त्यामुळेच महिला या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिरच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राज्य छत्रपती पुरस्कार विजेते प्रा.रंगनाथ डागवाले, परेश लोखंडे, रावसाहेब काकडे, संजय चौरे, अनिल शिंदे, घोलप, खराडे, गोटीपामुल, चौधरी आदिंसह मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका आदि उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री.बोराटे म्हणाले की, महात्मा फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणाचा पायाच रचला नाही, तर स्त्रीयांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्याचे प्रयत्न केले. सती प्रथा, बाल विवाह, भ्रुण हत्या अशा अनेक प्रथा समाजात रुढ होत्या त्या नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले. समाजाचे प्रबोधन आणि दलित मुक्तीचा प्रचार हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते. अशा थोर विचारवंत महात्मा फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बोराटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.