मुलांपुढे महापुरुषांचा आदर्श ठेवल्यास संस्काराची रुजवण होणार - पै.डोंगरे
अहमदनगर, दि. 14 - मुलांपुढे महापुरुषांचा आदर्श ठेवल्यास संस्काराची रुजवण होणार आहे. चुल व मूल या संकल्पनेला छेद देत, महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दार उघडे करुन दिले. सक्षम समाजव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी मुलींसाठी शाळा उघडल्या. महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी रायगडावर जावून शिवाजी महाराजांची समाधी शोधली व त्यांच्यावर पोवाडा लिहून जनजागृती केली. अशा महापुरुषांचे आदर्श ठेवल्यास युवापिढी भरकटणार नसल्याची आशा पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केली.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव कार्यक्रमात डोंगरे बोलत होते. प्रारंभी महात्मा फुले यांची जयंती तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस निळकंठ वाघमारे व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, तुकाराम खळदकर, सौ.शुभांगी धामणे, मंदा साळवे, डोंगरे संस्थेच्या सचिव सौ.मंदाताई डोंगरे, मयुर काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, लहानू जाधव आदिंसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.