आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे वीज वितरण कंपनीची मेहकर व लोणार तालुक्यात कोट्यवधिची विकास कामे मंजूर
बुलडाणा, दि. 25 - शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वीज वितरण कंपनीची मेहकर व लोणार तालुक्यात कोटयावधीची विकास कामे मंजूर झाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर उद्या दि.25 एप्रिल रोजी काही कामांचे उर्जामंत्री भुमिपुजन करणार आहेत.
मेहकर व लोणार तालुक्यातील नागरीकांचा शेतकर्यांचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून आमदार संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी उर्जामंत्री अधिकारी यांची भेट घेवून चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिले. याचाच परिणाम म्हणजे मेहकर तालुक्यात पिंपळगांव उंडा, कळंबेश्वर व मालेगांव येथे 33/111 केव्ही उपकेंद्र, मेहकर येथे 25 एमव्हीए रोहित्र बदलून 50 एमव्हीए केले. यासोबतच पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना भाग 1 अंतर्गत मेहकर तालुक्यातील देऊळगांव साकर्शा येथे 33 के.व्ही. उपकेंद्राचे तर मेहकर येथे 33 केव्ही उपकेंद्राचे भुमीपूजन उद्या 25 एप्रिल रोजी उर्जामंत्री चंद्रशेखन बावनकुळे यांचे हस्ते होत आहे.
एकात्मीक उर्जा विकास योजनेअंतर्गत मेहकर व लोणार शहरातील विद्युतीकरणाकरीता प्रणालीमधील रोष दुर करणे, रोहित्र व वाहिन्या सुस्थितीत ठेवणे, उच्चदाब/लघुदाब वाहिनीचे प्रमाण, कृती माणके हे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मेहकर करीता 6 कोटी 78 लक्ष रु.तर लोणार करीता 5 कोटी 81 लक्ष रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
एकात्मीक उर्जा विकास योजना टप्पा दोन अंतर्गत लोणार येथे नविन 33/11 केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यातील मोळा व पांगरखेड येथे नविन उपकेंद्र मंजूर झाले असून लोणार तालुक्यातील टिटवी येथे नविन उपकेंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कृषीपंपाना अखंड व दर्जेदार विजपुरवठा मिळण्यासाठी योजना अंतर्गत मेहकर तालुक्यातील जानेफळ, कळंबेश्वर तर लोणार तालुकतील टिटवी येथे अतिरीक्त पावर ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. त्याच बरोबर सदर योजनेत मेंटेनन्सची कामे होणार आहेत. त्याकरीता मेहकर साठी 11 कोटी 61 लाख व लोणार साठी 7 कोटी 69 लाख रु.खर्च होणार आहे.
मेहकर व लोणार तालुक्यातील खराब पोल बदलविणे, खराब तारा बदलविणे, गारडींग करणे, पोल व ट्रान्सफार्मची अर्थींग करणे, किटकॅट, केबल बॉक्स बदलविणे या करीता मेहकर साठी 10 कोटी 70 लक्ष रु.व लोणार साठी 7 कोटी एक लक्ष रु.चा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासर्व कामांमुळे मेहकर व लोणार तालुक्यातील जनतेचा, शेतकर्यांचा विजेचा प्रश्न मिटणार असून शेतकर्यांना चोवीस तास विज मिळणार आहे.