स्वप्नपूर्तीच्यावतीने भूषणनगर शाळेला वाढदिवसाची भेट
अहमदनगर, दि. 14 - शिवसेनेचे शहरप्रमुख व विद्यमाने नगरसेवक दिलीपराव सातपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केडगांव येथील स्वप्नपूर्ती कंस्ट्रक्शन ग्रुपने अवंतर खर्च टाळून भूषणनगर जिल्हा परिषदेच्या शाळेला सहा पंखे व विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले.
भूषणनगर शाळेत मुख्याध्यापक अंबादास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अनाथ मुलांना मदत केली जाते. याच धर्तीवर सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन शाळेला मदत केली गेली.
यावेळी गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री.सातपुते, घोडके गुरुजी यांचेही भाषणे झाली.
यावेळेस मनिष ठुबे, विजय निमसे, अमोल गोरे, सचिन भोंडे, दत्ता सरोदे यांनी स्वखर्चाने ही मदत केली.
मुख्याध्यापक अंबादास मंडलिक, गजरा कोतकर, अरुणा वीर, वनिता चिल्का, जयश्री भांबरे यांनी स्वप्नपूर्ती ग्रुपचे आभार मानले.