Breaking News

निघोज नागरी पतसंस्थेला 1 कोटी 75 लाखांचा निव्वळ नफा

। संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांची माहिती 

अहमदनगर, दि. 14 - निघोज नागरी सहकारी पतसंस्थेलला चालू आर्थिक वर्षात 2 कोटी 75 लाखांचा ढोबळ नफा असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता संस्थान प्रगतशील असल्याची माहिती संस्थेतचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की,  सर्वसामान्य  खातेदारांना लवकरच एटीएम सुविधा सुरु करण्याचे ठरविले आहे. सध्या सर्वसामान्य खातेदार त्यांचे अज्ञानामुळे किंवा दुसरे कुणीही आपल्या खात्या वरील पैसे काढून घेतील या भीतीपोटी बँकाचे एटीएम कार्ड वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना कॅशलेश व्यवहारासाठी अडचणी येतात. अशा खातेदारांना एटीएम वापरण्याचे प्रशिक्षण देऊन एटीएम सेवा सुरु करण्या्चे ठरविले आहे. पतसंस्थेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागात असून तेथील खातेदारांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमालाला चांगले बाजारभाव नसताना देखील पतसंस्थेला 31 मार्च 2017 अखेर 2 कोटी 75 लाखांचा ढोबळ नफा झाला असून सर्व आवश्यक तरतुदी करुन 1 कोटी 75 लाखांचा निव्वळ नफा शिल्लग राहिला आहे अशी माहिती कवाद यांनी दिली.
संस्थेचे उपाध्यसक्ष नामदेवराव थोरात यांनी संस्थेटच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना सांगितले की, 31 मार्च 2017 अखेर संस्थे कडे 75 कोटी 42 लाखांच्यां ठेवी, 58 कोटी 39 लाखाचे कर्जवाटप, 32 कोटी 93 लाखाची संरक्षित गुंतवणूक केलेली आहे.